

साताऱ्यात शासकीय जागांवर मटका जोमात
नागरिकांना दिसतेय पोलिसांना समजेना; युवा वर्गाभोवती आवळतोय फास
सातारा, ता. २९ ः शहर व परिसरात सध्या मटका (अवैध जुगार) व्यवसायाने अक्षरशः थैमान घातले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, हे अवैध धंदे बहुतांश ठिकाणी लपूनछपून नव्हे, तर सर्रास शासकीय मालमत्ता आणि सरकारी जमिनींवर सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. सामान्य नागरिकांना उघड्या डोळ्यांनी दिसणारे हे अवैध प्रकार संबंधित स्थानिक पोलिसांच्या नजरेस का पडत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेले मटक्याचे अड्डे बहुतांश करून शासकीय जागांवर किंवा सार्वजनिक मालमत्तांच्या आडोशाला थाटण्यात आलेले आहेत. प्रशासनाची कोणतीही भीती न बाळगता दिवसागणिक भरदिवसा हा व्यवसाय जोमात सुरू आहे. मटका व्यवसायामुळे परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मजूरवर्ग आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होत आहेत. रोज कमावलेले कष्टाचे पैसे लोक झटपट श्रीमंत होण्याच्या आशेने मटक्यात वाया घालवत आहेत, अशी चर्चा आहे.
या अवैध जुगाराची सवय युवा वर्गाला लागली आहे. हाताला काम नसलेल्या किंवा व्यसनाधीन झालेल्या युवकांचा ओघ मटक्याकडे वाढला आहे. यामुळे युवकांच्या खिशात पैसा टिकत नाही. व्यसनाधीनता आणि पैशाच्या कमतरतेमुळे युवकांकडून अनेकदा नैराश्य किंवा छोट्या-मोठ्या गुन्हेगारी मार्गांचा अवलंब केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्यांना रस्त्यावरून जाताना हे अवैध मटक्याचे अड्डे सहज दिसतात. मग कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना हे का दिसत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिस दलाने तत्काळ गांभीर्याने लक्ष घालून मटका अड्ड्यांवर छापा टाकावा आणि संबंधित चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी केली, तरच जरब बसेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
चौकट
---------
येथे नेमके चालते काय?
-------
-मुख्य बसस्थानक परिसरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे रिक्षा थांबा पाठीमागे
-राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे व्यापारी संकुल वाहनतळ
-समर्थ मंदिर चौकातील नवग्रह मंदिराच्या पाठीमागे
-पंचायत समिती कार्यालय पदपथ
-आळूचा खड्डा वाहनतळ
PNE26W62422
येथे मिळतेय मटक्याला चालना ः
सातारा ः समर्थ मंदिर चौकातील नवग्रह मंदिरामागील गॅरेजनजीक.
PNE26W62423
सातारा ः आळूचा खड्डा वाहनतळातील संबंधित टपऱ्या.
26W6242४
सातारा ः पंचायत समिती कार्यालय पदपथ.
PNE26W62425
सातारा ः राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे व्यापारी संकुल वाहनतळ.
(प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.