
शिरूर : शिरूर गावाबाहेरून जाणाऱ्या (बायपास) पुणे - अहिल्यानगर रस्त्यालगत आडबाजूच्या एका खोलीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सव्वा लाख रूपये किंमतीचा बेकायदा गुटखा व पान मसाला आणि तंबाखूचा साठा जप्त केला. शिरूर पोलिसांच्या या धाडसी कारवाईने शिरूर शहरातील गुटख्याच्या गोरखधंद्यावर प्रकाशझोत पडला आहे.