
पुणे : शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर शेकडो बेकायदा होर्डिंग आहेत; पण महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण कारभारामुळे बेकायदा होर्डिंग दिसत नाहीत. तात्पुरती कारवाई करून, प्रश्नांचे गांभीर्य कमी केले जाते, पण होर्डिंग पडण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यावरच महापालिका वठणीवर येईल, अशा शब्दांत शहरातील बेकायदा होर्डिंगवर नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.