Pune News : नदीपात्रातील 'ते' बेकायदा होर्डिंग पुन्हा एकदा जमीनदोस्त

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात लडकी पुलाच्या शेजारी नदीपात्रात बेकायदेशीरपणे महाकाय होर्डिंग उभे करणाऱ्याची मुजोरी महापालिकेने मोडून काढली.
pune Illegal Hoardings in Riverbed Demolished Again
pune Illegal Hoardings in Riverbed Demolished Againsakal
Updated on

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागात लडकी पुलाच्या शेजारी नदीपात्रात बेकायदेशीरपणे महाकाय होर्डिंग उभे करणाऱ्याची मुजोरी महापालिकेने मोडून काढून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज (ता. ४) पहाटे चार वाजता हे होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने २०२२ मध्ये जाहिरातीचे धोरण तयार केले आहे, त्यामध्ये कोणत्याही शासकीय जागेत, नदीपात्रात होर्डिंग उभे करता येणार नाही असे स्पष्ट नमूद केले आहे. तरीही टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागे एकमेकाला खेटून तीन होर्डिंग उभे करण्यात आले.

यापूर्वी हे होर्डिंग न्यायालयाच्या आदेशानुसार पाडून टाकले होते, पण महापालिकेने आमची परवानगी रद्द केली नाही असा दावा करत तेथे संबंधित व्यावसायिकाने पुन्हा होर्डिंग उभे केले. हे काम थांबविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेले असता तेथून त्यांना दादागिरी करून हुसकावून लावले. आयुक्त आले तर मी थांबत असतो असा दमही संबंधित होर्डिंग व्यावसायिकाने कर्मचाऱ्यांना दिला. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सोमवारी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कुचकामी भूमिका घेतल्याने त्याठिकाणी होर्डिंग उभे राहिले होते. त्यावरून या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती झाली.

रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी झाली, विधी विभागाचा अभिप्राय घेण्यात आला. त्यात या होर्डिंगची परवानगी संपून अनेक महिने झाल्याचे समोर आले. त्यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार आकाशचिन्ह विभागाने पहाटे चारच्या सुमारास क्रेनने हे होर्डिंग पाडून टाकले.

सांगडा जप्त करणे आवश्‍यक

हे तीन होर्डिंग उभारण्यासाठी प्रत्येकी सुमारे २ टन असे ६ टन लोखंड वापरण्यात आले आहे. गेल्यावर्षी होर्डिंग पाडल्यानंतर हे लोखंड जप्त केले नाही व त्याची विल्हेवाटही न लावता तेथेच पडून होते. तत्कालीन आयुक्तांनी हे जप्त करा असे आदेश दिले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा वर्षभराने या व्यावसायिकाने हाच सांगडा वापरून बेकायदेशीरपणे होर्डिंग उभे केले आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने सांगडा जप्त केला पाहिजे.

‘पुणे महापालिकेने कागदपत्रांची तपासणी करून नदीपात्रात उभारलेले होर्डिंग आज पहाटे पाडून टाकले आहे.’

- प्रशांत ठोंबरे, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com