Illegal Hotel Parking in Bal Gandharva Premises
sakal
पुणे - बालगंधर्व रंगमंदिर येथे रसिक प्रेक्षकांना, कलाकारांना पुरेसे पार्किंग मिळणे अपेक्षित आहे. पण या पार्किंगमध्ये थेट घोले रस्त्यावरील एका हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला मॅनेज करून ग्राहकांच्या गाड्यांची व्यवस्था केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला असून, हॉटेलचा कर्मचारी आम्ही पार्किंग विकत घेतले असल्याचा उद्धटपणे दावा करत असल्याचे दिसून आले आहे.