महामार्गावर सापळा रचून अवैध दारू वाहतुकीवर तळबीड पोलिसांची धडक कारवाई
बेकायदा दारून वाहतूकप्रकरणी
तासवडेनजीक एक जण ताब्यात
कारवाईत सुमारे २० हजारांची विदेशी दारू जप्त
उंब्रज, ता. २० : राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी तळबीड पोलिसांनी काल दुपारी तीनच्या सुमारास तासवडे फाट्यावर सापळा रचून कारवाई केली. त्यात महामार्गावरून संशयित हालचाली करणाऱ्या दुचाकीची तपासणी केली असता सुमारे १९ हजार ४०० रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, दारूचा साठा व वाहन असा मुद्देमाल जप्त केला. वैभव सुखदेव कोरडे (वय २५, रा. गजानन हाउसिंग सोसायटी, गोवारे, ता. कऱ्हाड, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस प्रवीण गायकवाड यांनी याबाबतची फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरीत्या दारू वाहतूक सुरू असल्याचे समजले. या वेळी पोलिसांनी तासवडे फाट्यावर सापळा रचला. त्यावेळी संशयित तरुण हा त्यांच्याकडील दुचाकीवरून (एमएच ३० डी १२८९) परवानगीशिवाय विदेशी दारूविक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आला. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे १९ हजार ४०० किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केला, तसेच सुमारे ३० हजार किमतीची दुचाकी देखील जप्त केली आहे.
या प्रकरणी तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक प्रशांत पाटील, आनंदा रजपूत, हवालदार योगेश भोसले, आप्पा ओंबसे, कुलदीप कोळी, प्रवीण गायकवाड, सुशांत कुंभार, अभय मोरे, मारुती बाकले यांनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक दिनकर काळे तपास करीत आहेत.
...................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

