पुणे - गणेशोत्सवामुळे शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (ता.२७ ) मद्य विक्रीला बंदी (ड्राय डे) घालण्यात आली असतानाही मद्य विक्री करणाऱ्या मटका अड्डाचालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री खडक पोलिसांच्या पथकाने शुक्रवार पेठेत छापा टाकून ही कारवाई केली. यात देशी, विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.