आंबेगावात गौण खनिज वाहतुकीवर कारवाई

आंबेगावात गौण खनिज वाहतुकीवर कारवाई

Published on

मंचर, ता. ७ : आंबेगाव तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सहा विभागामध्ये दिवसा व रात्री पथके तैनात केली आहे. दोन डंपर ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. यापुढे ठोस कारवाई सुरूच राहील, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली
तालुक्यातील विविध भागांत माती, मुरूम व वाळूच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष पथके नियुक्त केली आहेत. तहसील कार्यालयाच्या वतीने सहा मंडळांमध्ये सहा प्रतिबंधक पथके स्थापन केली असून, आंबेगाव (पेसा क्षेत्र), निरगुडसर, पारगाव परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान अवैध माती व मुरूम वाहतूक करणाऱ्या दोन डंपरची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमधून परवानगीशिवाय गौण खनिज वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तालुक्यातील तळेघर, पोखरी, डिंभे धरण परिसर, तिरपाड व पूर्व भागातील काही गावात अवैध खनिज उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत असल्याने महसूल प्रशासनाने ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूल विभागाने दिली. नागरिकांनीही अवैध वाळू, माती किंवा मुरूम वाहतूक होत असल्यास तत्काळ घोडेगाव येथील तहसील कार्यालयाला माहिती द्यावी, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे डॉ. वाघ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com