बेकायदा गौणखनिज 
उत्खनन मढ पट्ट्यात जोमात

बेकायदा गौणखनिज उत्खनन मढ पट्ट्यात जोमात

ओतूर, ता. ८ ः जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील मढ-तळेरान खोऱ्यातील गाव व वाड्यावस्त्यांमधून अवैधरीत्या गौणखनिज माती, मुरूमाची वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत आहे, असो आरोप नागरिकांमध्ये होत आहे.

डिंगोरे गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर बुधवारी रात्रीच्या वेळेस अवैध माती वाहतूक करणाऱ्या ट्रक व मोटारीचा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, या अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे हा अपघात झाला. मढ खोऱ्यातील तळेरान, सितेवाडी व इतर परिसरात तसेच खिरेश्वर व डोंगर भागांतून ही माती काढून अवैद्यरित्या नियम धाब्यावर बसवून उत्खनन केले जाते. जुन्नर तालुक्याचा हा पिंपळगाव- जोगा धरण परिसर व माळशेज पट्ट्या ईकोझोनमध्ये असून त्याठिकाणीउत्खनन करण्यास बंदी आहे. तरीही या परिसरात जेसीबी यंत्राच्या साहाय्याने उत्खनन सर्रास सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील डोंगर, टेकड्या, जंगले, झाडे-झुडपे, नामशेष होऊ लागले आहेत.

कारवाई करण्याची मागणी
या अवैद्य वाहतुकीमुळे रस्त्याची वाट लागली आहे. यातून उडणारी माती व धुळीने इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी महसुल विभागाने त्वरित या अवैध माती वाहतुकीला व उत्खननाला जबर बसवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com