Illegal Moneylending
sakal
राहू - दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावासह राहू बेट परिसरामध्ये अवैध सावकारीचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी वर्ग आर्थिक गुलामगिरीच्या विळख्यात अडकला आहे. यवत पोलिस ठाण्यात यासंदर्भातील अत्यल्प प्रमाणात तक्रारी दाखल होत आहेत. मात्र याबाबत संबंधित प्रशासनाकडून कारवाईकडे काणाडोळा केला जात आहे. परिणामी, सावकारांचा धंदा तेजीत सुरू आहे.