Murum Theft : मुरूम चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या वाहनांसमोर टाकला मुरूम; कनेरसरमध्ये २७०० ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा तक्रारीत दावा

कनेरसर येथे तब्बल २७०० ब्रास अनधिकृत मुरूम उत्खनन झाल्याची तक्रार समोर आली असून, कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाच्या वाहनांसमोरच माफियांनी मुरूम टाकून अडथळा निर्माण केल्याचा प्रकार घडला आहे.
theft of murum

theft of murum

sakal

Updated on: 

दावडी - अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या वाहनांसमोर हायवा गाडीतून मुरूम टाकून रस्ता अडविल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २२) सायंकाळी घडला. तसेच कनेरसर (ता.खेड) येथील हजारेवस्ती परिसरातील शासनाच्या संपादित जमिनीत दोन जेसीबीच्या साहाय्याने अवैध उत्खनन सुरू असल्याचे महसूल पथकाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com