

पुणे : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये तयार झालेले व कोणत्याही प्रकारचा आयातीचा परवाना नसलेले सौंदर्यप्रसाधनांचा साठा पिंपरी चिंचवडमधील औषधाच्या दुकानात सापडला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तानमधील होरीक केमिस्ट्री कंपनीकडून उत्पादित करण्यात आलेल्या या सौंदर्यप्रसाधनाच्या साठ्यावर उत्पादकाचे नाव नाही. विक्रेत्याकडे आयात – निर्यात करण्याचे कोणतेही परवाने नाहीत.
दरम्यान, हा साठा नष्ट करण्यात आला असून संबंधितांवर खटले दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सोमवारी अधिवेशनात दिली. याबाबत खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जप्त केलेल्या सौदर्यप्रसाधनाविषयी प्रश्न उपस्थित केला होता.