

लोणी काळभोर, ता. १५ : थकीत कर्ज वसुलीसाठी अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेने सील केलेली मिळकत बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॅनिअल दिनकर पवार (रा. होरेबनगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, एमआयटी कॉलेज जवळ, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका प्रतिभा राहुल तुपे (वय ४६, रा. मल्हार बंगला, डीपी रोड, साधुनाना तुपे वस्ती, साडेसतरा नळी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांनी कदमवाकवस्ती येथील मिळकतीवर स्वतःच्या व कुटुंबीयांच्या नावे एकूण ७५ लाख रुपयांचे स्थावर तारण कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्यामुळे संस्थेने २१ जुलै २०२५ला पोलिस बंदोबस्तात या मिळकतीचा ताबा घेऊन ती सील केली होती. मात्र, ३० जुलै २०२५ला पवार यांनी संस्थेची कोणतीही परवानगी न घेता घराचे सील आणि कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे उघड झाले. वारंवार सूचना देऊनही ताबा न सोडल्याने अखेर लोणी काळभोर लिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.