illegal road drivers
illegal road driversSakal

बेकायदेशीर रस्त्यांचं बांधकाम; नागरिकांनी थांबवली डंपरची अवैध वाहतूक

पुण्यातील धायरी येथील डीएसके विश्‍व सोसायटीच्या अंतर्गत बेकायदेशीरपणे रस्त्यांचे बांधकाम व्यावसायिकांनी सुरू केले आहे.

पुणे : धायरी येथील डीएसके विश्‍व सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यांचा वापर काही बांधकाम व्यावसायिकांनी सुरू केला, तसेच डंपरची धोकादायक वाहतूक सुरू झाल्याने सोसायटीतील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यामुळे आज (ता. १२) नागरिकांनी रस्त्यावर उतरून हा रस्ता सार्वजनिक नाही तर सोसायटीचा आहे असे सांगत डंपरची वाहतूक बंद केली. (Illegal Road Development In Pune Dhayari)

धायरी येथील डीएसके विश्‍वच्या अंतर्गत ९ सोसायटी असून, या सोसायटीच्या अंतर्गत रस्त्याची देखभाल दुरुस्ती, वीज, उद्यान, स्वच्छतेचा खर्च सोसायट्यांकडून केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून डीएसके मधून जाणारा रस्ता सार्वजनिक असल्याप्रमाणे वापरला जात होता. बांधकाम साईटवरचा राडारोडा, मुरूम घेऊन जाणारे डंपर देखील हाच रस्ता वापरत असल्याने लहान मुले, वृद्ध, महिलांसह सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही जीव मुठीत धरून सोसायटीमध्ये फिरावे लागत आहे.

illegal road drivers
Jr. एबीडी मुंबईच्या ताफ्यात; इतक्या कोटीला घेतले विकत

या त्रासाला वैतागून आज नागरिक रस्त्यावर उतरून ही डंपर वाहतूक बंद केली. यावेळी संदीप चव्हाण, सचिन पांगारे, सनी पवार, राजीव कुलकर्णी, पारस महाले, संतोष चौधरी, अनंत पाटील आदी उपस्थित होते.

‘‘डीएसके विश्‍वमधून कोणीही रस्ता वापरत आहे, त्याचा त्रास येथे राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. नागरिकांनी एकत्र येऊ आज डंपर वाहतूक बंद केली आहे. हा रस्ता इतरांना वापरता येणार नाही.’’

- प्रथमेश कुलकर्णी, रहिवासी,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com