

मोनोक्रोटोफॉसची
छुप्या मार्गाने विक्री
ॲग्रोवन वृत्तसेवा
खामगाव, जि. बुलडाणा ः केंद्र सरकारने बंदी घातलेल्या मोनोक्रोटोफॉस या घातक कीटकनाशकाची बाजारात चोरट्या मार्गाने विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे.
काही विक्रेते व ठोक पुरवठादारांकडून या कीटकनाशकाची लिटरला तब्बल ६०० ते ७०० रुपयांदरम्यान विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. बंदीमुळे अधिकृत पुरवठा थांबलेला असतानाही शिल्लक साठ्याची विक्री केली जात आहे.
मोनोक्रोटोफॉस हे तीव्र विषारी ऑरगॅनोफॉस्फेट गटातील कीटकनाशक असून, मानव, प्राणी आणि पक्ष्यांसाठी अत्यंत घातक मानले जाते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये फवारणीदरम्यान विषबाधेच्या घटना घडून शेतकरी व मजुरांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर या कीटकनाशकाच्या वापरावर निर्बंध आणण्याची मागणी सातत्याने होत होती. २०११ मध्ये भाज्यांवरील वापरावर पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र इतर पिकांसाठी त्याचा वापर सुरू होता. त्यानंतर २०२३ मध्ये यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
बंदीपूर्वी काही कंपन्यांनी उत्पादित केलेला आणि बाजारात वितरित केलेला मोनोक्रोटोफॉसचा साठा एप्रिल २०२६पर्यंतच्या मुदतीचा होता. आता या साठ्याची मुदतही संपली आहे. असे असतानाही विविध पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी काही शेतकरी या कीटकनाशकाची मागणी करीत असल्याने काही विक्रेते गैरफायदा घेत असल्याची चर्चा आहे.
ओळखीच्या व्यक्तीला विक्री
बंदी असलेला मोनोक्रोटोफॉस ‘ओळख आणि जवळचा शेतकरी’ असा फॉर्म्यूला वापरून विकला जात आहे. मोनोक्रोटोफॉसचे अधिकृत उत्पादन व विक्री बंद असतानाही त्याची विक्री केली जात असल्याने बनावट कीटकनाशकाच्या विक्रीचा धोका वाढला आहे. मोनोक्रोटोफॉसच्या नावाखाली बोगस किंवा अन्य रासायनिक घटक असलेले उत्पादन शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याबरोबरच शेतकरी व फवारणी करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.