
गेवराई : बीड जिल्ह्यात गुटखा,वाळू चोरी, नशाजन्य पदार्थ अशावर एसपी नवनीत काँवत यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.विशेष म्हणजे ज्या पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरु आहेत.अशा ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा(एलसीबी) देखील कारवाईचे आदेश दिल्याने गेवराईतील राक्षसभुवन शिवारात गोदावरी पात्रातुन अवैध वाळू उपसा होत असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन एलसीबीने काल कारवाई करत तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन दोन वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत.