

विनापरवाना वाळू वाहतूक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगोला, ता. २० : मांजरी येथील माण नदीपात्रातून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर सांगोला पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे एक ब्रास वाळूसह ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विशाल महादेव खांडेकर (वय २४, रा. देवळे, ता. सांगोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी रविवारी (ता. २०) मांजरी परिसरात गस्तीवर असताना माण नदीपात्रातून वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मांजरी-मेथवडे रस्त्यावर लाडले मशाक बाबा दर्ग्याजवळ सापळा रचण्यात आला. सकाळी साडेसातच्या सुमारास संशयित अशोक लेलँड वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात सुमारे एक ब्रास वाळू आढळली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना व रॉयल्टी नसल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी एमएच १२ एसएफ ८०२१ क्रमांकाचे वाहन व सुमारे सात हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बीएनएस २०२३ मधील कलम ३०३ (२) तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यातील कलम ९ व १५ नुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस कर्मचारी धीरजकुमार लवटे, कोकरे, इंगळे, सावजी व साबळे यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.