
वेल्हे,(पुणे) : राजगड किल्ला (ता.राजगड) संरक्षित क्षेत्राच्या हद्दीत अनाधिकृत चौथाराचे बांधकाम करून त्यावर मेघडंबरी (छत्री) बसवून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनाधिकृत बसवल्या प्रकरणी हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेचे रवींद्र दिलीप पडवळ रा. वडकी (ता. हवेली) यांच्यासह इतर 25 ते 30 अज्ञान सदस्यांच्या विरुद्ध वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली आहे .