ढेबेवाडी काहीरला अवैध लाकूड वाहतूक पकडली
काहीरमध्ये पकडली अवैध लाकूड वाहतूक
वन विभागाची कारवाई; ट्रकसह मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा
ढेबेवाडी, ता. ६ : ट्रकमधून लाकडाची विनापरवाना अवैध वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने एकावर कारवाई केली. त्यात ट्रकसह लाकूड माल जप्त केला. वनपरिक्षेत्र पाटणमधील काहीर येथे काहीर- आंबेघर मार्गावर ही कारवाई झाली.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, काहीर- आंबेघर मार्गावर काहीर येथे वनविभागाची गस्त सुरू असताना विनापरवाना अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक (एमएच ०८ एच ०९५२) व विनापरवाना तोड केलेला जळाऊ लाकूड माल (७.३७८ घनमीटर) जप्त केला. याप्रकरणी संतोष शिवाजी भंडलकर (रा. तळमावले, ता. पाटण) याच्यावर भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे, वनपाल राहुल जगताप, वनरक्षक किरण वाकचौरे, सतीश वीर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी नलवडे म्हणाले, ‘‘या वनगुन्ह्यासाठी एक वर्ष कारावास किंवा पाच हजार रुपये दंड किवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे. अवैध वृक्षतोड व वाहतूक, अवैध शिकार, तसेच राखीव वनामध्ये अतिक्रमण करणे, वणवा लावणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे घडल्यास संबंधितावर वनविभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही त्याबाबत जागरूकता पाळून वनविभागाशी संपर्क साधावा.’’
B08176
ढेबेवाडी : जप्त केलेल्या ट्रक, तसेच संशयितासमवेत वनविभागाचे पथक.
-----------------................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

