रुई परिसरात विनापरवाना लाकूड वाहतुकीवर कारवाई

रुई परिसरात विनापरवाना लाकूड वाहतुकीवर कारवाई
Published on

बारामती, ता. २२ : रुई (ता. बारामती) गावच्या हद्दीत बारामती एमआयडीसी रस्त्यावर वनविभागाने सापळा रचून विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला. या कारवाईत ८ ते ९ टन कडुनिंब व जांभळाचे लाकूड हस्तगत करण्यात आले असून, वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनरक्षक संतोष जराड व त्यांच्या पथकाला गस्तीदरम्यान टाटा कंपनीचा एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो संशयास्पदरित्या आढळला. तपासणी केली असता, त्यात कडुनिंब आणि जांभूळ प्रजातीचे तोडलेले लाकूड विनापरवाना वाहून नेले जात असल्याचे समोर आले. वनविभागाच्या पथकाने मुद्देमालासह टेम्पो ताब्यात घेऊन कार्यालयात जमा केला आहे. या कारवाईदरम्यान वाहन चालक फरार झाला असून, चालक व मालकावर भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, वनपाल एस.आर. उंडे आणि संतोष जराड यांनी केली. पुढील तपास वनविभाग करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com