कदमवाकवस्तीत सव्वा लाखांचा गुटखा जप्त

कदमवाकवस्तीत सव्वा लाखांचा गुटखा जप्त
Published on

लोणी काळभोर, ता. २१ : कदमवाकवस्ती येथील घोरपडेवस्ती परिसरात पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३३ हजार १०० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त केला. गुरुवारी (ता. २०) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी रुपेश आत्माराम गायकवाड (वय ३३, रा. गायकवाड कॉम्प्लेक्स, घोरपडेवस्ती) याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार अशोक गिरी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड कॉम्प्लेक्समधील एका खोलीत विक्रीच्या उद्देशाने हा साठा करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी यांनी पंचांसमक्ष मालाचा पंचनामा करून नमुने सीलबंद केले. मानवी आरोग्यास घातक असलेल्या या पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश बोराटे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. परिसरात अवैध तंबाखू विक्रीचे मोठे जाळे सक्रिय असल्याची चर्चा असून, या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com