MLA Mahesh Kaleesakal
पुणे
Illegal Activities in Chakan MIDC : खेडमधील अवैध धंद्यांवर कारवाई करा; आमदार काळे यांची विधानसभेत मागणी
Khed Illegal Businesses : खेड तालुक्यातील चाकण आणि महाळुंगे परिसरात अवैध धंद्यांना राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मूक संमती असल्याचा गंभीर आरोप आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत केला आहे.
कुरुळी/राजगुरुनगर : खेड तालुक्यातील चाकण आणि महाळुंगे औद्योगिक परिसरात अवैध धंद्यांची हप्ते वसुलीची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. या परिसरात अवैध दारू विक्री, मटका, जुगार, लॉजिंग, हॉटेल आणि गॅस रिफिलिंगसारखे बेकायदा धंदे परवाने मिळाल्यासारखे राजरोसपणे चालत आहेत.