
पुणे : शहरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या शुद्ध पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू असून घरगुती वापर आणि व्यावसायिक कारणांसाठी अनधिकृत नळजोड घेतले जात आहेत. बेकरी, हॉटेल्स, आरओ प्लांट, वॉशिंग सेंटर, खासगी टॅंकर व्यावसायिक, बांधकाम प्रकल्प अशा विविध स्वरूपात थेट महापालिकेच्या जलवाहिन्यांवर सर्रास बेकायदेशीरपणे नळजोड घेऊन पाणी वापरले जात आहे. मात्र, याबाबत महापालिका प्रशासनाकडून कारवाईची भूमिका थंड असल्याचे चित्र आहे.