
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर वाढत आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता. १४) मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून, जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. परिणामी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.