या आमदारांची तत्परता भारी, 24 तास सोडविला पाच गावांचा प्रश्‍न 

mahavitaran
mahavitaran
Updated on

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्‍यातील टाकळी भीमा येथील बिघाड झालेले वीज उपकेंद्र आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नाने व अधिकाऱ्यांच्या तत्परतेने पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून कार्यरत झाले. त्यामुळे या परिसरातील 5 गावांच्या विजेचा प्रश्‍न अवघ्या 24 तासांत सुटला. 

टाकळी भीमा येथील पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून दोन वीजवाहिन्यांद्वारे 62 रोहित्रांच्या माध्यमातून शिरूर तालुक्‍यातील टाकळी भीमा, घोलपवाडी, सातकरवाडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी व इतर वाड्यावस्त्यांवरील सुमारे 950 कृषिपंप व 1150 ग्राहकांना वीज पुरविली जाते. या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा बंद झाला. याबाबत परिसरातील कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांना माहिती दिली. 

आमदार पवार यांनी नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी त्वरित नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला. अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, केडगावचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके व संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन ट्रान्सफॉर्मर उपकेंद्रात बसविला. बिघडलेला ट्रान्सफॉर्मर काढणे व नवीन बसविण्यासाठी तब्बल 24 तास लागले. 

तळेगावचा पाणी पुरवठा सुरळीत 
तळेगाव ढमढेरे येथील पाणीपुरवठा योजनेचे रोहित्र गेल्या आठवड्यात जळाले होते, त्यामुळे पाणीपुरवठा बंद होता. आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांमुळे महावितरणने रोहित्र बसवून दिल्याने येथील पाणीयोजना सुरू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com