फिरत्या विसर्जन हौदाकडे फिरवली पाठ, गणेश विसर्जन कॅनॉलमध्येच!

Immersion of Ganesh In the Canal and ignored to the revolving immersion tank in pune
Immersion of Ganesh In the Canal and ignored to the revolving immersion tank in pune
Updated on

धायरी(पुणे) :अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस होय. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता, परंतू मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आज विसर्जनासाठी देखील तितक्याच साधेपणाने पण, पवित्र मानसिक भावनेतून सर्वत्र मोठी लगबग सुरू होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरात 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'', आशा घोषणा देत घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन हे घरीच बादलीत करण्यात आले तर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यांनी बाप्पाचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये करण्यात आले. गणेश मुर्ती संकलन व निर्माल्य संकलनची पालिकेने ज्या ठिकाणी सोय केले त्या ठिकाणी नागरिक जाऊन मुर्ती तसेच निर्माल्य देत होते. या वर्षी गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं नागरिकांनी साजरा केला.

गणेश मंडळांनी कोरोनामुळे या वर्षी गणेश उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले. येथील मंडळांनी स्टेज, विद्युत रोषणाई, स्पीकर, व विविध लहान मोठयांसाठी कार्यक्रम तसेच मिरवणूकसाठी लागणारे भव्य असे ढोल, ताशा, डीजे, लेझीम अशा अनेक गोष्टींना फाटा देत गणेश उत्सव सध्या पद्धतीने साजरा केला. महानगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या फिरत्या हौदांकडे गणेश भक्तांनी फिरवली पाठ, बाप्पाचे विसर्जन कॅनॉल मध्येच यावेळी मात्र, वडगाव फाटा येथील कॅनॉल जवळ महानगरपालिका एकही कर्मचारी कॅनॉलकडे फिरकले नाही. त्या बरोबर पोलीस बंदोबस्त देखील कॅनॉल परिसरात बघावयास मिळाला नाही.

गणपती विसर्जनासाठी स्थनिक लहान लहान मुले आपला जीव धोक्यात घालून कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन करत होते, तसेच कॅनॉल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिक कुठल्याही प्रकारची खबरदारी घेताने दिसत नव्हते. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती. महानगरपालिकेला दान केलेल्या मुर्त्या महानगरपालिका करणार काय? अशी परिसरामधील नागरिकांनमध्ये चर्चा सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com