सहकारनगरमध्ये घरगुती गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन

नागरिकांनी फिरत्या हौदात मूर्ती विसर्जनास करण्यास दिले प्राधान्य
pune
punesakal

सहकारनगर : सहकारनगर पद्मावती प्रभाग ३५  मध्ये मनपाच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन गणेश मूर्ती संकलन केंद्र ठीक ठिकाणी व चौका चौकात  विसर्जन केंद्र  व फिरते हौद तयार करून परिसरात फिरवले याला सोसायटी व वस्ती मधील नागरिकांनी हौदमध्ये मूर्ती विसर्जन व निर्माल्य देऊन गणेश बाप्पाला अखेरचा निरोप देत  पर्यावरण पूरक विसर्जनास प्राधान्य दिले.

सहकारनगर येथील  अरण्येश्वर ,टांगेवाला कॉलनी, गजलक्ष्मी सोसायटी, सारंग सोसायटी,तावरे कॉलनी, तुळशीबागवाले कॉलनी, तळजाई वसाहत, तळजाई पठार, धनकवडी,महात्मा फुले ( तीन हत्ती) चौक ,चव्हाणनगर येथील नागरिकांनी विसर्जन  करीत मोठ्या उत्साहात बापाला अखेरचा निरोप दिला.यावेळी मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करीत मूर्ती संकलन केले. यावेळी वरीष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम,नरेंद्र भालेराव,आरोग्य निरीक्षक शांताराम सोनवणे,दिनेश सोनवणे, एकनाथ माने, मुकादम राजू जाधव,पप्पू खंदारे इ. मनपा कर्मचारी यांनी गणेश विसर्जन दिवशी  रात्री अकरा पर्यंत थांबून परिसर स्वच्छ करून  परिश्रम घेतले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रुपेश तुरे म्हणाले, कोरोनाच्या काळात गणेशोत्समध्ये नागरिकांना घराच्या जवळच गणपती मूर्तीचे विसर्जन करता यावे म्हणून पाचव्या दिवशी,सातव्या ,नव्या व अनंत चतुर्थी अकराव्या दिवशी टॅकटर टॉली फिरत्या हौदाची सोय करून घरच्या घरीच पर्यावरण पूरक विसर्जन करण्यासाठी आवाहन करीत मूर्ती संकलन करून आज अखेर गणेश बापाला मोठ्या उत्साहात नागरिकांनी निरोप दिला.यावेळी प्रज्ञा पोतदार (सहाय्यक आयुक्त मनपा सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालय) म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात यावर्षी नागरिकांनी फिरत्या हौतात व संकलन केंद्रावर उस्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण पूरक शांततेत गणेश विसर्जन केले.

यामध्ये कोणतेही वाद्य व मिरवणूक न काढता नागरिकांनी सहकार्य करीत अखेर उत्साहात गजरायला अखेरचा निरोप दिला. यामध्ये प्रभाग 35 मध्ये एकूण 6720 मूर्ती संकलन करून दोन टन निर्माल्य गोळा केले गेले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com