एएफएमसीतर्फे 'इम्पॅक्ट २०२२ ' परिषद संपन्न

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) ‘इम्पॅक्ट २०२२’ ही परिषद नुकतीच संपन्न झाली.
Impact 2022
Impact 2022Sakal
Summary

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) ‘इम्पॅक्ट २०२२’ ही परिषद नुकतीच संपन्न झाली.

पुणे - येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) ‘इम्पॅक्ट २०२२’ ही परिषद नुकतीच संपन्न झाली. मेडिकल जर्नल आर्म्ड फोर्सेस इंडिया’च्या (एमजेएएफआय) वतीने या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. लष्करी वैद्यकीय सेवेचे (एएफएमएस) महासंचालक सर्जन व्हाइस ॲडमिरल रजत दत्ता यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन पार पडले. देशभरातून सुमारे १२० प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता. नवोदित लेखक, समीक्षक आणि संपादकांना वैज्ञानिक लेखनाबाबत मार्गदर्शन करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.

‘प्रभावी संशोधन आणि प्रकाशनाद्वारे शैक्षणिक उत्कृष्टता’ हा या परिषदेचा विषय होता. वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांना त्यांचे संशोधन जगभरात प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि वैद्यकीय सराव व धोरणे सुधारण्यासाठी वैज्ञानिक आधार प्रदान करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. परिषदेदरम्यान एमजेएएफआयच्या वैद्यकीय प्रकाशनाचा ७८ वा खंड प्रकाशित करण्यात आली. यावेळी व्हाइस ॲडमिरल दत्ता यांनी वैद्यकीय लेखनाची कला शिकण्याची आणि पुनरावलोकन करण्याच्या महत्वावर भर दिला. तसेच त्यांनी डिजिटल युगात ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या वापर यावर ही प्रकाश टाकला.

दरम्यान एएफएमसीचे अधिष्ठाता एअर व्हाइस मार्शल राजेश वैद्य यांनी सर्व प्रतिनिधींचे स्‍वागत करत वैद्यकीय लेखन आणि संपादनाची कौशल्ये शिकण्याच्या महत्वाबरोबरच, प्रकाशनातील नैतिकता यावर सगळ्यांचे मार्गदर्शन केले.

तीन दिवसांच्या या कार्यक्रमात वैद्यकीय प्रकाशनातील समकालीन मुद्द्यांवर संवादात्मक सत्रे पर पडली. तरुण लेखकांसाठी वैद्यकीय प्रकाशनातील त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता वैद्यकीय लेखन, प्रकाशनातील नैतिकता, पुनरावलोकन, बायोस्टॅटिस्टिक्स सारख्या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्या. तर वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या वेलकम ट्रस्ट संशोधन प्रयोगशाळेचे सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग यांनी ‘चांगल्या वैज्ञानिक लेखनाचे बारकावे’ या विषयावर माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com