पुणे : संपाचा शैक्षणिक कामकाजावर परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

संशोधनासह प्रशासकीय कार्यवाहीत अडचणी; संप सुरूच

पुणे : संपाचा शैक्षणिक कामकाजावर परिणाम

पुणे : लॉकडाउनमुळे(lockdown) आधीच दोन वर्षे संशोधन आणि प्रशासकीय कामकाज रखडले आहे. त्यात प्रलंबीत मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील(savitribai phule pune university) विभागाची दारे बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुहेरी अडचणींचा सामना करावा लागत असून, लवकरात लवकर संपावर तोडगा निघावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल

महाराष्ट्र विद्यापीठ(maharashtra university) व सलग्नित महाविद्यालयीन कर्मचारी महासंघ, कसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीने विविध प्रलंबीत मागण्यांसाठी मंगळवार (ता.२१) पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे मंगळवार पासूनच आवारातील विभाग आणि प्रशासकीय कार्यालये बंद आहेत. बेमुदत संप असल्यामुळे शैक्षणिक कामकाज किती काळ प्रभावित राहील या बद्दल अनिश्चितता असल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहे. युक्रांदचे शहरउपाध्यक्ष कमलाकर शेटे म्हणाले,‘‘शैक्षणिक कामानिमित्त तीनही जिल्ह्यांतून विद्यार्थी विद्यापीठात येत असतात. बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणींना न्याय मिळत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता. हा संप जास्त काळ चालू नये.’’ विज्ञान शाखेतील सर्वच विभागांमध्ये संशोधन या संपामुळे प्रभावित झाले आहे.

संपामुळे उद्भवलेल्या अडचणी

  1. लॉकडाउनमध्ये प्रलंबीत राहिलेले प्रशासकीय काम पुन्हा रखडत आहे

  2. पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांचे काम पुन्हा थांबले आहे

  3. बाहेरगावाहून शैक्षणिक कामानिमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान

  4. अनलॉकमुळे कामाला वेग मिळाला होता. दीर्घकाळ संप चालल्यास मुदतवाढ घ्यावी लागणार

विद्यार्थी म्हणतात

  1. कर्मचाऱ्यांच्या संपाला विरोध नाही

  2. विभाग खुले करावेत, आमचे काम आम्ही करत राहू

  3. -संपावर तोडगा लवकरात लवकर निघावा

हेही वाचा: जिंजी ते सिंहगड ११०० किलोमिटरची पायी गरूडभरारी मोहिम

कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या आणि आमचा संपाला विरोध नाही. लॉकडाउनमुळे आमचे दीड वर्ष काहीच काम झाले नाही. आता कुठे पुर्ववत होत होते. मात्र संपामुळे पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. संपावर त्वरित तोडगा निघावा.

- बाळासाहेब ठोंबरे, संशोधक विद्यार्थी

संपात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना आम्ही बळजबरी करत नाही. ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. विद्यार्थ्यांचे शिकवणी आणि संशोधन कार्य थांबविण्याचा आमचा प्रयत्न नाही. त्याच्या आड कर्मचारी येणार नाही.

- डॉ. सुनील धिवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कर्मचारी संघ

Web Title: Impact Of Strike On Academic Function In Pune University

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsPune University
go to top