पुणे - ‘जिल्हा परिषदेच्या बांधकामांचा दर्जा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवरच असावा,’ अशी सूचना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम विभागाच्या सर्व निविदा प्रक्रिया ‘ई-निविदा’ पद्धतीनेच राबवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच ‘एकाच कामासाठी दोनवेळा उद्घाटनाला बोलवू नका,’ असे खडेबोल ही जिल्हा परिषद प्रशासनाला सुनावले.