तुमचा मास्क विषाणूंना रोखतो का? चुकीच्या मास्क वापराचा आहे धोका

imp mask
imp mask

पुणे : जगभरातील विविध संशोधनातून आणि प्रत्यक्ष पाहणीतून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुयोग्य पद्धतीने घातलेला मास्क उपयोगी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. वॉशिंग्टन येथील सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड डेव्हिस यांनी प्रत्यक्ष नमुने घेऊन प्रयोगशाळेत सुक्ष्मदर्शकाखाली तपासले आहे. त्यामध्ये तोंड आणि नाकातून बाहेर पडणाऱ्या द्रवाला ‘मास्क’ ९८ टक्के रोखत असल्याचे सिद्ध झाले आहे. देशात कोरोनाची रूग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य असून सर्वांनी याची खबरदारी घेतली तर या प्रसाराला पायबंद घालता येईल. मास्क नक्की कसा असावा, त्याची निवड कशी करावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात त्याचा घेतलेला हा आढावा...

हेही वाचा - पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल

मास्कचा चुकीचा वापर ठरेल घातक : 
पोलिसांची भीती किंवा जनाची लाज म्हणून बाहेर पडल्यावर मास्क घालणारे अनेक लोक दिसतात. परंतु तो मास्क योग्य पद्धतीने घातलाय का? त्यातून संसर्ग तर होणार नाही ना? याची काळजी मात्र कोणीही घेताना दिसत नाही. 

मास्क कसा असावा? 

  • - वैद्यकीय कर्मचारी वगळता इतरांनी मास्क घेताना त्याचे कापड, आकार आणि श्‍वसनासाठीची योग्यता तपासणे गरजेचे. 
  • - शक्‍यतो सुती कपड्याचा तोंड आणि नाक व्यवस्थित झाकणारा मास्क निवडावा. 
  • - दोन किंवा अधिक पडदे असलेला आणि नाका जवळ फुगवटा असलेला मास्क उत्तम. 
  • - मास्कच्या कडा चेहऱ्यावर व्यवस्थित "फिट्ट' झाल्या पाहिजे. 
  • - वॉल्व असलेला मास्क शक्‍यतो टाळा. 
  • - मास्क हातात घेण्यापूर्वी आणि काढण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. 
  • - तुटलेला, खराब असलेला मास्क वापरू नका. 
  • - मास्कच्या दोन्ही बाजूंच्या दोऱ्यांनाच हात लावा. 
  • - नाक, तोंड आणि हनूवटी झाकेल, तसेच कुठेही गॅप राहणार नाही अशा पद्धतीने मास्क बांधा. 
  • - स्वच्छ प्लास्टिक किंवा इतर बॅगमध्ये मास्क ठेवा. 
  • - मास्क नियमित स्वच्छ धुवा. 


हे टाळाच : 

  • - सैल असलेला मास्क वापरू नका. 
  • - नाक उघडे ठेवू नका. 
  • - श्‍वास घ्यायला प्रतिबंध करणारे मास्क वापरू नका. 
  • - आपला मास्क दुसऱ्याला देऊ नका. 
  • - ओले, अस्वच्छ, प्लास्टिक पासून बनलेले, कमी आकाराचे मास्क वापरू नका. 
  • - सतत मास्कला हात लावू नका. 
  • - बोलताना मास्क काढू नका. 
  • - चुकीच्या पद्धतीने दुसरी व्यक्ती जवळ असताना मास्क काढू नका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com