लॉकडाउनबाबत बारामतीकरांसाठी महत्त्वाचा निर्णय... 

मिलिंद संगई
Saturday, 25 April 2020

राज्य सरकारच्या पुढील सूचना येईपर्यंत बारामतीत लॉकडाउन सुरुच राहणार आहे.

 

बारामती (पुणे) : केंद्र सरकारकडून दुकाने उघडण्याबाबत सूचना दिल्याबाबत अद्याप माहिती नाही, मात्र बारामती शहर हे संपूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पुढील सूचना येईपर्यंत बारामतीत लॉकडाउन सुरुच राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

काही वृत्तवाहिन्यांकडून आज केंद्र सरकारने दुकाने सुरु करण्यास परवानगी दिल्याच्या बातम्या दाखविल्या गेल्या. त्यानंतर बारामतीतील व्यापाऱ्यांकडून याबाबत सकाळपासून चौकशी सुरु केली होती. मात्र, बारामतीत आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे तसेच एका रुग्णाचा मृत्यू झालेला असल्याने बारामती नगरपालिका क्षेत्र "रेड झोन'मध्ये येत आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाउन कायमच राहणार असल्याचा खुलासा कांबळे यांनी केला आहे.

बारामतीतील व्यापाऱ्यांनी याबाबत चौकशी केलेली होती, मात्र त्यांनाही याबाबत कल्पना दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important decision for citizens of Baramati regarding lockdown

Tags
टॉपिकस
Topic Tags: