उपमुख्यमंत्री अजित पवारांचा CAA, NRC बाबत महत्त्वाचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

आधीपासून सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजना सुरू ठेवणार आहे. राज्यावर आधीच कर्जाचा बोजा आहे. आणखी कर्ज काढता येऊ शकतं का? त्याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) कायद्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकासआघाडी सरकारनेही कायदा लागू करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. पुण्यातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी पवार यांनी राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. यावेळी, 'महाराष्ट्रामध्ये एनआरसी लागू करायचा की नाही त्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील. पण आमची भूमिका एकच आहे. महाराष्ट्रात कुणालाही एनआरसी, सीएएचा त्रास होऊ देणार नाही असं सगळ्यांचं मत आहे', अशी महत्त्वाची माहिती अजित पवारांनी दिला.

भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्र सरकारने एनआयएकडे तपास सोपवला आहे. या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली आहे, असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - Video लई भारी...बालसंशोधकांचा रोबोट करणार वाहतूक नियंत्रण

तसंच, आधीपासून सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजना सुरू ठेवणार आहे. राज्यावर आधीच कर्जाचा बोजा आहे. आणखी कर्ज काढता येऊ शकतं का? त्याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या बजेटनुसार किती पैसे येतात ते पहाव लागेल, असंही अजित पवार म्हणाले.

पुण्यात सुरु झाले शिवभोजन? पाहा कोठे?

पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

 1. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करायची असल्याने गेल्या वर्षीपेक्षा थोडा जास्त नियत्वे देण्यात आलाय. गेल्या पाच वर्षात ९८ कोटी रूपये पुण्याला कमी मिळालेत. किमान जास्त नाही मिळाले तरी ठीक पण जे ठरलं त्याप्रमाणे तरी द्यायला हवे होते.
 2. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर यांची मागणी मान्य केली.  शाहू स्मारकाच्या कामासाठी निधी देण्याच्या निर्णय मुख्यमंत्र्यांना विचारून घेईन
 3. अंबाबाई विकास आराखडा मंजूर करून पैसे देणार
 4. इचलकरंजी आणि रंकाळा, कळंबा तलावाच्या कामासाठी निधी देणार
 5. पुरामध्ये वाहून गेलेले रस्ते बनवण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ६० कोटी दिले
 6. कोल्हापुरमध्ये १ लाख रूपयापर्यंत मदत पूरबाधीतांना मदत केली आहे. त्यासाठी मान्यता आणि बजेट मध्ये तरतूद सुद्धा केली आहे.
 7. कर्नाटक मधल्या पुलामुळे मागे पाण्याला फुगवटा येतो त्यामुळे मागे पूरस्थिती तयार होते
 8. पूरस्थितीमध्ये काम करण्यासाठी नव्या बोटी आणि त्या चालवण्यासाठी स्थानिक १५ मुलांना ट्रेनिंग आणि लाईफ जॅकेट घ्यायला मंजूर
 9. कास तलावाची उंची वाढवण्यासाठी निधीची तरतूद
 10. साताऱ्यात शिवाजी महाराजांचं संग्रहालय तयार पण बाकी तयारीसाठी निधी देणार
 11. सज्जनगडावर रोप वे साठी निधी पीपीपी माॅडेल वर करू
 12. साताऱ्यात मेडीकल कॉलेज सुरू करण्यासाठी तरतूद , कृष्णा खोरेने २५ एकर जागा दिली
 13. आदिवासींच्या शासकीय आश्रमशाळा चांगल्या पण खाजगी आश्रमशाळांसाठी सेंट्रल किचनचा विचार सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important disclosure by deputy chief ministerajit pawar regarding CAA and NRC