कोरोनानं दिले नवे शब्द; फिजिकल डिस्टन्सिंग, क्वॉरंटाईन आणि बरचं काही

PPE-Kit
PPE-Kit

कोरोनाचा संसर्ग चीनमधून सुरू झाला आणि तो जगभरात पसरला. या काळात सर्वांनाच काही नवीन शब्द प्रथमच वापरायची वेळ आली. यातील अनेक शब्द वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत आणि ते वापरताना गल्लत होऊ शकते. योग्य शब्द वापरण्यासाठी आपल्याला काही नव्या शब्दांची किमान तोंडओळख होणे गरजेचे आहे. अशाच काही शब्द व संज्ञांबद्दल...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • विषाणू - संसर्गजन्य विषाणू जो केवळ सजीव पेशींमध्ये मोठ्या संख्येने वाढतो.
  • कोरोना विषाणू - हा एक प्रकारचा विषाणू असून, सर्दीपासून गंभीर आजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या रोगवाढीसाठी कारणीभूत ठरतो. सध्याच्या विषाणूला AIS/SARS-Cov-२ म्हणजेच (Severe Acute Respiratory Syndrome) असे नाव दिले आहे किंवा त्याला ‘नोव्हेल कोरोना व्हायरसही (Novel Corona virus) म्हणतात.
  • कोविड-१९ - नोव्हेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या रोगाला कोविड-१९ असे म्हणतात. 
  • ॲसिम्प्टोमॅटिक - असा रुग्ण, की जो कोविडची लक्षणे दाखवीत नाही. मात्र, अशा रुग्णांपैकी काही रुग्ण इतरांना कोविडचे संक्रमण करू शकतात. 
  • सिम्प्टोमॅटिक - कोविडची लक्षणे दाखविणारा रुग्ण. 
  • क्वॉरंटाईन - जो कोव्हिडचा रुग्ण नाही, मात्र रुग्णाच्या संपर्कात आलेला आहे किंवा जो अशा क्षेत्रातून आलेला आहे की, त्याच्यापासून संक्रमण होण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तीला इतरांच्या संपर्कापासून दूर ठेवणे म्हणजे विलगीकरण. यामध्ये २ प्रकारचे विलगीकरण आहे.
    अ) संस्थात्मक विलगीकरण
    ब) गृह विलगीकरण. 
  • देशातर्गत प्रवास केल्यास शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार १४ दिवस क्वॉरंटाईन किंवा घरी विलगीकरण केले जाते. 
  • आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले असल्यास ७ दिवस संस्थात्मक (Institutional) क्वारंटाईन एखाद्या खासगी हॉटेलमध्ये करता येते. 
  • सात दिवस विलगीकरण झाल्यानंतर उर्वरीत सात दिवस गृह विलगीकरण करण्यास अनुमती आहे. 
  • एखादी व्यक्ती काही कामानिमित्त देशांतर्गत प्रवास करत असेल व तिचा परतीचा प्रवास १४ दिवसांच्या आत असल्यास तशा परतीच्या प्रवासाचा पुरावा दर्शवून या विलगीकरणापासून सूट मिळू शकते.  
  • आयसोलेशन - एखादी व्यक्ती कोव्हिडचा रुग्ण आहे हे सिद्ध झाले आहे, अशा रुग्णापासून रोगाचा प्रसार न होण्यासाठी त्याचे अलगीकरण करणे. असे अलगीकरण हे हॉस्पिटल किंवा शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे घरीसुद्धा केले जाऊ शकते.

राज्य शासनाच्या दिनांक ६ जून २०२० रोजीच्या निर्णयाप्रमाणे लक्षणे नसलेला रुग्ण घरी तशी सोय असल्यास स्वत:ला घरीही अलगीकरण करू शकतो. मात्र, अशा रुग्णाला अतिसौम्य किंवा लक्षणे नसतील, तरच हा पर्याय दिला जातो. अशा व्यक्तींबरोबर दिवसरात्र २४x७ काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असली पाहिजे. अशा व्यक्तीने आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे व शासनाने विहित केलेले प्रतिज्ञापत्र देणेही आवश्यक आहे.

क्वारंटाईन व आयसोलेशन
ज्ञात रुग्णाला इतर लोकांपासून वेगळे करतात त्याला आयसोलेशन म्हणतात व ज्या व्यक्तीला आजार झालेला नाही, परंतु आजार होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीपासून संक्रमण टाळण्यासाठी त्याला क्वारंटाईन केले जाते. 

  • सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग - कोरोना व्हायरस हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचतो, संपर्कामुळे त्याचा प्रसार होतो, हा प्रसार थांबविण्यासाठी २ व्यक्तींमध्ये किमान ५ ते ६ फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. त्याला सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतात.
  • पॅन्डेमिक - एखादा आजार संपूर्ण देश/खंड/जगभर व्यापला असेल त्याला पॅन्डेमिक म्हणतात. 
  • इम्युलोकॉप्रोमाईज्ड - अशी व्यक्ती, की ज्याची रोगप्रतिकार शक्ती ही कमी झाली आहे किंवा जवळ-जवळ संपुष्टात आली आहे.
  • कम्युनिटी स्प्रेड - अशा प्रकारच्या रोगाचा प्रसार, की जेथे संक्रमण कोठून झाले आहे, त्याचा स्रोत निश्‍चित करता येत नाही, म्हणजेच कोरोनाच्या बाबतीत ज्याने कुठलाही प्रवास केला नव्हता किंवा ज्याचा कुठल्याही रुग्णाशी संपर्क आला नव्हता अशा व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव होणे. 
  • कोमोर्बिडिटी Comorbidity - अशा व्यक्ती ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी झालेल्या आहेत. उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, हृदयरोग इ. 
  • इन्क्युबिशन पिरिअड - एखाद्या रुग्णाला आजार झालेला नाही, प्रत्यक्ष रोगाची लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी म्हणजेच त्या कालावधीमध्ये रोग सुप्त अवस्थेत राहतो. 
  • मृत्युदर - प्रत्येक १०० रोग्यांमागे किती व्यक्ती मरण पावतात त्याची आकडेवारी. 
  • पीपीई कीट (Personal Protection Equipment) - कोरोनाबाधित रुग्णावर उपचार किंवा त्याची सेवा करतात त्या व्यक्तीला रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घालावयाचा गणवेश.
  • आर-नॉट R-Naught/ आर ओ R०- एका व्यक्तीकडून किती व्यक्तींना कोरोनाचे संक्रमण होऊ शकते, त्याची आकडेवारी. 
  • आरटी-पीसीआर तपासणी RT-PCR Test - Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction, रुग्णाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा नाही ते बघण्यासाठी ही चाचणी करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com