esakal | शाळा सुरू करण्याबाबत देशभरातील मुख्याध्यापक काय म्हणताहेत? वाचा सविस्तर!
sakal

बोलून बातमी शोधा

School

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्याबाबत चर्चा होत आहेत. परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत शाळा सूरू होण्याची केवळ २० ते ५० टक्के शक्यता आहे. ​

शाळा सुरू करण्याबाबत देशभरातील मुख्याध्यापक काय म्हणताहेत? वाचा सविस्तर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पावसाळ्यात शाळा सुरू केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देशभरातील शाळा ऑक्टोबरपूर्वी सुरू होणे केवळ अशक्य आहे," असे देशभरातील नामांकित शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापकांचे मत आहे.

अशी सुरू ठेवता येतील सलून आणि ब्यूटी पार्लर

पेरेंट्स सर्कलच्या वतीने आयोजित 'कोविड-१९ : शाळांवर झालेला परिणाम' विषयावर ऑनलाइन चर्चासत्रात आयोजित करण्यात आले होते. यात चेन्नईतील पद्मा शेषाद्री बाल भवनच्या संचालक डॉ. शीला राजेंद्र, नवी दिल्लीतील मॉर्डन पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अलका कपूर, शिक्षणतज्ञ फातिमा अगरकर, पेरेंट्स सर्कलच्या व्यवस्थापकीय संचालक नलिना रामालक्ष्मी, डी.ए. व्ही. पब्लिक स्कूलच्या सिम्मी कलसी, ऑल इंडिया आयसीएसई स्कूल असोसिएशनचे कार्यकारी सदस्य डॉ. एन. के. चार्ल्स सहभागी झाले होते.

तुमचा जुना अॅंड्राॅइड फोन शाळेला दान करून गरिब विद्यार्थ्यांना करा मदत

डॉ. शिला म्हणाल्या, "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्याबाबत चर्चा होत आहेत. परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत शाळा सूरू होण्याची केवळ २० ते ५० टक्के शक्यता आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता, प्रत्यक्ष शाळा सूरू झाल्यास त्यांच्यामधील शारीरिक अंतर पाळणे शक्य होणार नाही आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीही शक्यता आहे." याला कपूर यांनी दुजोरा दिला, त्या म्हणाल्या,"कोरोनाच्या संसर्गाचा वाढता आलेख हा खाली येत नाही आणि कोरोना कमी करण्यासाठी लस आणि औषध येत नाही तोपर्यंत कोणत्याही शिक्षण संस्थेची शाळा सूरू करण्याची तयारी नसेल."

पुणे : ग्रामीण भागात वाढलाय सापांचा वावर; सर्पदंश झाल्यास...

"शाळा, महाविद्यालये बंद असल्याने जवळपास २५ कोटी विद्यार्थी आज घरात बसून आहेत. त्यातील केवळ ३० ते ३५ टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचे आव्हान सध्या उभे ठाकले आहे. त्यातून लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे," असे कपूर यांनी नमूद केले.

शाळांसमोरील आव्हाने:-
- लॉकडाऊनमुळे निर्माण झालेला शालेय विद्यार्थ्यांचा भावनिक गुंता सोडविण्यासाठी करावी लागणार कसरत
- शारीरिक अंतर पाळणे होणार अवघड
- शुल्कातील ८० टक्के हे शाळेतील कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतो, परिणामी या वर्षातील शुल्क वसूल करणे होतंय कठिण
- ऑनलाइन शिक्षणात मुलांचे मूल्यांकन कसे करणार!!
- यावर्षी विद्यार्थ्यांना 'ग्रेड' देण्यासाठी संबंधित शिक्षण मंडळाने नियमावली करावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांमध्ये संभ्रम
"या शैक्षणिक वर्षात पालकांनी त्यांच्या मुलांकडून काय अपेक्षित केले पाहिजे. मुलांना ऑनलाईनद्वारे शिकविलेले किती समजले, ते खरच शिकले का की त्यांना केवळ माहिती मिळाली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या ग्रेडची काळजी करायची की मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करायचे, याबाबत पालक संभ्रमात आहेत. शाळा सूरू होण्यापेक्षा मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या ज्ञानात पडणारी भर महत्त्वाची आहे."
- नलिना रामालक्ष्मी, व्यवस्थापकीय संचालक, पेरेंट्स सर्कल

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image