कॉलेज केव्हा सुरु होणार? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत दिली महत्वाची माहिती

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 6 October 2020

महाविद्यालय कधी सुरू होणार असे सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, "राज्यातील कोरोनाची स्थिती अद्याप सामान्य झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवणे योग्य नसल्याने आत्ताच महाविद्यालय सुरू करता येणार नाहीत. त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहील. हे ऑनलाईन शिक्षण त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ग्राह्य धरले जाणार आहे.
 

पुणे : राज्यातील कोरोनाची परस्थिती निवळत नाही, तो पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नाहीत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर धनराज माने, तंत्रशिक्षणचे संचालक डॉ. अभय वाघ, 
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल पवार यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविद्यालय कधी सुरू होणार असे सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, "राज्यातील कोरोनाची स्थिती अद्याप सामान्य झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवणे योग्य नसल्याने आत्ताच महाविद्यालय सुरू करता येणार नाहीत. त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहील. हे ऑनलाईन शिक्षण त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ग्राह्य धरले जाणार आहे.

पुणे विद्यापीठ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेणार आहे. यातून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी त्यांना पुन्हा संधी दिली जाईल. ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ ऑक्टोबरपासून सराव परीक्षा देता येतील. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा घेण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. त्यांचे प्रतिनिधी आजच्या बैठकीत उपस्थित होते. जिल्हा प्रशासन व पोलिसांचे यासाठी सहकार्य करणार अाहेत. परीक्षा केंद्रावर सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. पुणे, नगर आणि नाशिक येथील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अडचणी कक्ष स्थापन केला आहे. त्यात विद्यापीठ व प्रशासनाचे अधिकार्यांचा समावेश आहे. 

शेतकरयांपुढे एकीकडे असेल 'काटा' दुसरीकडे नोटा  : रावसाहेब दानवे

डेव्हलपमेंट शुल्क स्वीकारू नये

कोरोनामुळे महाविद्यालय सुरू होणार नाहीत अशा वेळी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून केवळ शैक्षणिक शुल्क यावे डेव्हलपमेंट शुल्क, जिमखाना असे शुल्क स्विकारू नये. महाविद्यालयांनी  विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे शुल्क वसूल करत असेल तर त्यांची तक्रार करावी, अशा संस्थांवर कारवाई केली जाईल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी शुल्कवाढ करू, नये याबाबत निर्देश दिले आहेत. पुणे विद्यापीठाने ही प्रस्तावित केलेली शुल्कवाढ एका वर्षासाठी स्थगित केली आहे त्यामुळे संस्थांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करू असेही सामंत यांनी सांगितले. 

'सीएचबी' साठी नेट-सेट प्राध्यापकांना प्राधान्य
महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर तासिका तत्वावर (सीएचबी) प्राध्यापक नियुक्ती केली जाते. कोरोनामुळे राज्य सरकारने सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियेवर बंदी घातली  त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन देखील या नियुक्त्या रखडल्या होत्या. शासनाने ही बंदी उठवावी अशी मागणी केली जात होती. याबाबत शासनाने नुकताच निर्णय घेतला असून, भरतीसाठी लवकरच जाहिरात काढले जाहिरात काढली जाईल. यामध्ये संबंधित विषयाच्या सेट-नेट पात्र प्राध्यापकांना प्राधान्य दिले जाईल त्यानंतर इतर उमेदवारांचा विचार केला जाईल. 

तसेच प्राध्यापकांच्या भरती संदर्भात वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यात भरती बंदी मधून प्राध्यापकांना बघावे अशी मागणी केली आहे. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य शासनाने यापूर्वी 40% रिक्त जागा भरण्यास परवानगी दिलेली आहे, त्यामुळे ही कोंडी सुटेल असे सामंत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impossible to start college right now said Education Minister Uday Samant