
पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात २०१८ मध्ये वाहनांची संख्या ५२ लाख होती. ती गेल्या पाच वर्षांत ७२ लाख इतकी झाली आहे. मागील पाच वर्षांत सुमारे २० लाख वाहने वाढली असून, रस्त्यांची वहन क्षमता तेवढीच आहे. तथापि महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत सुधारणा होत आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी मंगळवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत दिली.