Baramati : बारामतीत रस्ते झाले! ; नागरिकांना परिपूर्ण माहितीच मिळेना

शहरातील ब-याच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले असले तरी त्या रस्त्याची परिपूर्ण माहिती नागरिकांना फारशी समजतच नाही अशी स्थिती आहे.
Baramati
Baramati sakal

बारामती : शहरातील ब-याच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले असले तरी त्या रस्त्याची परिपूर्ण माहिती नागरिकांना फारशी समजतच नाही अशी स्थिती आहे. केलेला रस्ता कोणत्या कंत्राटदाराने केला, त्या साठी किती खर्च आला, त्या रस्त्याचे किती लेयर आहेत, त्याची मुदत किती आहे या बाबींचे फलक लोकांच्या माहितीसाठी लावणे गरजेचे असताना असे फलक लावण्याचे कष्ट ना कंत्राटदार घेत ना प्रशासकीय यंत्रणेला त्याचे काही सोयरसुतक असते. संबंधित रस्ता पूर्ण झाला आहे की अजून त्यावर थर अंथरले जाणार आहेत याचीही माहिती मिळत नाही.

बारामती शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण झालेले असले तरी त्यावर अजून काही थर आहेत का, त्यावर थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे केव्हा मारणार, या बाबतची माहिती नागरिकांना समजायला मार्गच नसतो. डांबरीकरण केले खड्डे बुजविले की काम संपले अशीच स्थिती असते. या बाबत अनेकदा अधिका-यांना विनंती करुनही या बाबत फार काही केले जात नाही अशीही नागरिकांची तक्रार आहे.

नगरपालिकेचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केले जातात, अशा स्थितीत अनेकदा परस्परांवर जबाबदारी ढकलण्याचाही प्रयत्न केला जातो. शहरात असंख्य गतीरोधक आहेत, त्यातील एकाही गतीरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत, अनेकदा नवीन वाहनचालकांना गतीरोधकाचा अंदाज नसल्याने अपघाताची भीती असते.

बारामतीत झेब्रा क्रॉसिंगच नाहीत....

शहरातील सर्वच मुख्य चौकात पादचा-यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरुन ये जा करावी लागते, तरीही बारामतीत एकाही रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग करण्याचे सौजन्य नगरपालिका दाखवत नाही. सिटी इन चौक, कोर्ट कॉर्नर, पंचायत समिती चौक, भिगवण चौक, इंदापूर चौक, गुनवडी चौकासह अनेक चौकात झेब्रा क्रॉसिंगच नसल्याने लोक कशाही पध्दतीने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात, अनेकदा यातून अपघातही घडतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com