CT Scan : राज्यात सार्वजनिक विभागामार्फत ३८ सरकारी रुग्णालयात मोफत २४ तास सिटीस्कॅन सुविधा

मंचर (ता. आंबेगाव) उपजिल्हा रुग्णालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
CT Scan
CT Scan sakal

मंचर :“राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक ३८ सी.टी.स्कॅन विनामुल्य तपासणी केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामध्ये मंचर (ता.आंबेगाव) उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे.

येथे सुरु झालेल्या सी.टी.स्कॅन तपासणी केंद्रामुळे मेंदूप्रमाणेच कर्करोग, हृदय विकार, पोटाचे, अर्धांगवायू या आजारांची प्राथमिक माहिती समजू शकते. त्यानंतर तातडीने उपचार सुरु होण्यास मदत होते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांनी सी.टी.स्कॅन तपासणी करून घ्यावी.” असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

मंचर (ता.आंबेगाव) उपजिल्हा रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर यांच्या वतीने सार्वजनिक खासगी तत्वावर सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी दिलीप वळसे पाटील बोलत होते.

यावेळी मंचर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समिती सदस्य देवेंद्र शहा, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, आदिवासी समाजाचे नेते सुभाषराव मोरमारे, क्रस्ना डायग्नोस्टिक केंद्राचे आदर्श कर्नावट, डॉ.परीमल सावंत, रुपेश डागर, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, नीलकंठ काळे, रवी लोमटे उपस्थित होते.

शहा म्हणाले सर्वसामान्य“मंचर शहरात प्राथमिक आरोग्य केंद्रही नव्हते.गरीब रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागत होती. रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन १६ वर्षापूर्वी ग्रामीण रुग्णालय भाड्याच्या खोलीत सुरु केले. त्यानंतर जैन समाजाने विनामुल्य जागा उपलब्ध करून दिल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय सुरु झाले. या रूग्णालयामध्ये आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, पारनेर व संगमनेर तालुक्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. कोरोना काळात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उत्कृष्ट सेवा मंचर रुग्णालयाने दिली आहे.”

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव यांनी प्रस्ताविक केले. डॉ. संजयकुमार भवारी यांनी सूत्रसंचालन व जगदीश घिसे यांनी आभार मानले.

“मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा विस्तार अवसरी फाटा-तांबडेमळा येथे होणार असून त्यासाठी लवकरच भूमिपूजन होईल. रुग्णांच्या सोयीसाठी तेथे एम.आर.आय मशीन बसविले जाईल.या भागातील एकही रुग्ण पुणे, मुंबईला जाऊ नये.अश्या पद्धतीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.”

-दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री

“मंचर उपजिल्हा रुग्णालयात २४ तास सी.टी.स्कॅन तपासणी केंद्र सुरु राहणार आहे. तीन मिनिटात तपासणीचे काम पूर्ण होते. रेडीओलोजिस्ट आजाराचे निदान करतात.”

येथे सुरु होणार सी.टी.स्कॅन तपासणी केंद्र

  • ठाणे विभाग : मीरा-भाईंदर, माणगाव, पनवेल, जव्हार, डहाणू, उल्हासनगर, शहापूर, पंढरपूर.

  • पुणे विभाग: मंचर, इंदापूर, कराड, इचलकरंजी, गडहिंग्लज.

  • सिंधुदुर्ग विभाग : सावंतवाडी, कणकवली.

  • रत्नागिरी विभाग : कळमणी.

  • नाशिक विभाग :- कळवण, येवला, शिरपूर, चौपडा, वैजापूर, काळमनोरी, परळी, कैज, उमरगा, तुळजापूर, मुखेड मालेगाव, उदगीर.

  • नागपूर विभाग : हिंगणघाट, तुमसर, वरोरा, चिमूर, मुर्तीजापुर, कारंजा, अचलपूर, शेगाव, खामगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com