Drunk Driver
Drunk Driver

Pune: दारू पिऊन गाडी चालवल्यास आता थेट ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द? पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Pune Police for Drunk Driver: दारू पिऊन वाहन चालवल्याने अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारवाई किंवा दंड करून देखील अपघातांमध्ये घट झालेली नाही.
Published on

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पुण्यातील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यास आता थेट ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द केले जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

दारू पिऊन वाहन चालवल्याने अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारवाई किंवा दंड करून देखील अपघातांमध्ये घट झालेली नाही. लोक दारू पिऊन गाडी चालवतच आहेत. याची गंभीर देखल घेत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यास थेट लायसेन्स रद्द करण्याची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयाला प्रस्ताव पाठवला आहे.

Drunk Driver
Pune News : शेवटचा पर्याय! उरुळी कांचनमध्ये दशक्रिया विधीत होणारी भाषणबाजी बंद करण्यासाठी चक्क लागले बॅनर

पुण्यात गेल्या काही दिवसात अनेक भीषण अपघात घडले आहेत. यातील अनेक अपघात दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे घडल्याचं समोर आलं आहे. कल्याणीनगरमधील पोर्शे कार चालकाने दोन अभियंताला उडवले होते. दोनच दिवसांपूर्णी एकाने मद्यधुंद अवस्थेत दोन पोलिसांना उडवले होते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहे. पोलिसांचा प्रस्ताव न्यायालयात मान्य होतो का? हे पाहावं लागेल.

Drunk Driver
Worli Hit and Run Case: "मित्राचा मोबाईल ट्रेस केला अन् अख्ख कुटुंब..."; मिहीर शाह पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला?

पुणे-मुंबई महामार्गावर गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना एका मद्यधुंद चालकाने उडवले होते. पोलिसांना उडवून आरोपी चालक घरी जाऊन निवांत झोपला होता. यारून अशा लोकांची मुजोरी वाढल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, दारू पिऊन गाडी चालवल्यास चालकाला पहिल्या वेळेस १० हजार रूपये दंड भरावा लागतो. दुसऱ्यांदा असा गुन्हा घडल्यास २० रुपये दंड भरावा लागतो. काही प्रकरणामध्ये तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com