esakal | सुप्रिया सुळेंच्या ट्विटमुळं गावकऱ्यांना काही तासांत मिळाला दिलासा!
sakal

बोलून बातमी शोधा

सुप्रिया सुळेंच्या ट्विटमुळं गावकऱ्यांना काही तासांत मिळाला दिलासा!

सुप्रिया सुळेंच्या ट्विटमुळं गावकऱ्यांना काही तासांत मिळाला दिलासा!

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी:किरकटवाडीतील मोठ्या सोसायट्यांमधील कचरा गाडी न आल्याने पाच ते सहा दिवसांपासून पडून असल्याचे वृत्त दै. 'सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे महानगरपालिका प्रशासनाने त्याची दखल घेत कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी पसरलेल्या सोसायट्यांमधील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.(In Kirkatwadi the garbage truck arrived the next day after supriya Sule Tweet)

30 जून रोजी किरकटवाडी गावचा पालिकेत समावेश झाला. त्यानंतर सोसायट्यांमधील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येणे बंद झाले. कचऱ्याच्या दुर्गंधीने संतप्त झालेल्या किरकटवाडीतील उत्सव,कल्पक होम्स, आपलं घर, कमल ग्रीनलीफ,अर्बन ग्राम, मोरया स्पर्श, सुखस्वप्न अशा मोठ्या सोसायट्यांमधील नागरिकांनी पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

हेही वाचा: महामेट्रोच्या कार्यपद्धतीवर पुण्यात रिक्षा पंचायतीचे आक्षेप

'सकाळ'ने पालिका प्रशासनाचे किरकटवाडील कचरा समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेण्यात आली. दुसऱ्याच दिवशी किरकटवाडील सोसायट्यांमधील कचरा घेऊन जाण्यासाठी तीन ते चार गाड्या दाखल झाल्या व कचरा नेण्यात आला. 'सकाळ'ने समस्या मांडल्याने प्रशासनाने दखल घेतली असे म्हणत फेसबुक,ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप अशा समाज माध्यमांवर किरकटवाडीतील नागरिकांनी 'सकाळ'चे आभार मानले.

loading image