Pune News
Pune News sakal

Pune News : ओतूर येथे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यास झाला दहा हजार रूपये दंड

न्यायालयाने दहा हजार रूपयाचा दंड सुनावला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.
Published on

ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथील पोलीसानी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यास पकडून मा.न्यायालयात हजर केले असता त्याला मा.न्यायालयाने दहा हजार रूपयाचा दंड सुनावला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली. सत्तार खदीर शेख, वय 40 रा. कोटमवाडी, ता. परभणी, जि. परभणी असे दंड झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

Pune News
Sangli News : ‘सरळ सेवा भरती’अंतर्गत ४२ जणांना नियुक्ती

सदर आरोपीला ओतूर पोलीसांनी दारू पिऊन वाहन चालवण्याच्या गुन्हात अटक करून मंगळवारी मोटार वाहन कायद्यातील विविध कलमा अंतर्गत जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्याने मा.न्यायालया समोर त्याचा गुन्हा कबूल केल्याने त्यास प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी नम्रता बिरादार यांनी सदर आरोपीस दहा हजार रुपये दंड सुनावला.

याबाबत अधिक माहिती अशी की ओतूर पोलीसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या सत्तार शेख यांना अटक करून त्याच्या विरूद्ध शासकिय फिर्याद एस.एस.जायभाये यांनी दाखल केली.तसेच सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.डी.गेंगजे यांनी तपासी अमलदाराचे काम पाहिले.तर कोर्ट अंमलदार म्हणून अतुल भेके यांनी काम पाहिले.सदर आरोपीला दारू पिऊन वाहन चालवल्या बद्दल दहा हजार रूपये दंड मा.न्यायालयाने सुनावल्यामुळे इतर वाहन चालक आता दारू पिऊन वाहन चालविण्यास धजावणार नाही.त्यामुळे हा निकाल सामाजीक दृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com