esakal | पुणे : २४ तासात कोरोनाने घेतले शंभराहून अधिक बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus Death

पुणे : २४ तासात कोरोनाने घेतले शंभराहून अधिक बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) एकाच दिवसांत कोरोनामुळे तब्बल ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एका दिवसातील कोरोना मृत्यूनी शंभराचा आकडा ओलांडला आहे. गुरुवारच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ४९ मृत्यू आहेत. जिल्ह्यात गुरुवारी ९ हजार ९५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील ५ हजार ३९५ जण आहेत.

बुधवारी (ता.१४) जिल्ह्यातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ९४ होता. त्यात गुरुवारी २० मृत्यूची भर पडली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधिक ९९ मृत्यू झाले होते. त्यामुळे गुरुवारी झालेल्या मृतांच्या संख्येने याआधीचा उच्चांक मोडला आहे. दिवसांतील एकूण मृत्यूमध्ये पिंपरी चिंचवडमधील ३६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १७, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन मृत्यू आहेत.

हेही वाचा: पुण्यात खासगी हॉस्पिटल्सना भाड्याने मिळणार सरकारी व्हेंटिलेटर; विभागीय आयुक्तांची परवानगी

जिल्ह्यात गुरुवारी ८ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ३२१ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ११०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ४१८, नगरपालिका हद्दीतील १६१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १६५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. गुरुवारच्या एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २ हजार८६ , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ७८२, नगरपालिका हद्दीतील ५२६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १६७ रुग्ण आहेत. सद्यःस्थितीत २३ हजार २२२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तसेच ७५ हजार ६३१ गृहविलगीकरणात आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ८ हजार ६२७, पिंपरी चिंचवडमधील ६ हजार ५४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५ हजार १४२, नगरपालिका हद्दीतील २ हजार २८२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६२६ रुग्ण आहेत.

loading image
go to top