

Pune Election 2026
sakal
पुणे : पुण्याचे महापौरपद महिलांसाठी आरक्षित झाल्याने आता महापालिकेतील सभागृह नेते पद, स्थायी समिती अध्यक्ष या पदासाठी पुरुष नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. महापौरपद नाही तर नाही, शहराचा कारभार हाकण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेत ही दोन्ही पदे महत्त्वाचे असल्याने ते तरी आपल्या पदरात पडावेत यासाठी भाजपच्या वरिष्ठ नगरसेवकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे.