Pune News : पुण्यात शासकीय कार्यालयात चोरी, 12 वर्षांची महत्वाची कागदपत्रे घेऊन चोर झाला फरार

संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली
Pune News
Pune NewsEsakal

पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन कार्यालयात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव यासारखे कागदपत्र चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव यासारखे कागदपत्र चोरीला गेल्याची माहिती आहे. 2007 ते 2019 या दरम्यानचे कागदपत्रे चोरीला गेली आहेत. 

2007 ते 2019 या दरम्यानचे कागदपत्र चोरीला गेले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात आहे. या कार्यालयातील जुने वसतिगृह येथील एका रेकॉर्ड रूममध्ये ही चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.

हे ही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन चे कार्यालय पुण्यात असून त्या ठिकाणी एक जुने बंद स्थितीत असलेले एक वसतिगृह आहे. या ठिकाणी एका खोलीचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव, पात्रता फॉर्म, पुनर्गुण मूल्यांकन अर्ज, फोटोकॉपी चे अर्ज असे महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेले आहेत.

हा सर्व प्रकार उघडकीस येताच पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातील चतुशृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Pune News
Sunshma Andhare : आता राणा यांच्या भगव्या साडीवरुन वाद; अंधारेंनी उकरुन काढली 'ती' गोष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com