पुणे : गुन्हेगार दवाखान्यातून फरार; पोलिसांना हलगर्जीपणा नडला

हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याशी संपर्क साधला असता सोन्या धोत्रेच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्याला पकडण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
criminal
criminalfile photo
Summary

हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याशी संपर्क साधला असता सोन्या धोत्रेच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्याला पकडण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

किरकटवाडी (पुणे) : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार तुषार उर्फ सोन्या धोत्रे हवेली पोलिसांना चकवा देऊन किरकटवाडी फाट्यावरील दवाखान्यातून शुक्रवारी (ता.४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फरार झाला आहे. आरोपीवर लक्ष ठेवण्याबाबत हवेली पोलिसांनी दाखवलेला हलगर्जीपणा पोलिसांच्या अंगलट आला आहे. (in Pune where a criminal escaped from hospital by cheating the police)

सिंहगड रस्त्यावरील जयप्रकाश नारायण नगर, नांदेड (ता. हवेली) येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगार सोन्या धोत्रेवर हवेली पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2 मे रोजी रात्रीच्या वेळी एका घरात घुसून तोडफोड करत शस्त्राचा धाक दाखवून महिलांना शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी संबंधीत महिलेच्या फिर्यादीवरुन हवेली पोलीस ठाण्यात धोत्रेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

criminal
बारामतीकरांनो, कोरोना रिपोर्ट येईपर्यंत घरी जाता येणार नाही

त्यानंतर पोलीस अटक करण्यासाठी आले असता धोत्रेने अटक टाळण्यासाठी बाथरूममधील डेटॉल प्राशन केले. त्यामुळे त्याला उपचारासाठी किरकटवाडी फाट्यावरील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस अटक करण्यासाठी येण्याच्या अगोदर सोन्या धोत्रे त्याच्या काही साथीदारांसह दवाखान्याच्या मागच्या दाराने रिक्षातून फरार झाला आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याशी संपर्क साधला असता सोन्या धोत्रेच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्याला पकडण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com