
खडकवासला : सिंहगडावरील कल्याण दरवाजा परिसरात कडेकपारीला आगी मधमाश्यांची पोळी आहेत. काही पर्यटकांनी रविवारी (ता. २६) खोडसाळपणा केल्यामुळे या मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षारक्षक, पुरातत्त्व विभागाचे नियंत्रणाखालील, पहारेकरी व स्थानिक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे विश्रामगृहाच्या शेजारून कल्याण दरवाजाच्या दिशेने जाणाऱ्या तटबंदीलगत गस्तीची पायवाट आहे. राम टाके त्या परिसरात बांबूचे बेट आहेत. तेथे गडाचा कपारीसारखा भाग आहे.
त्या ठिकाणी आग्या मधमाश्यांची पोळी आहेत. रविवारी सकाळी आठ साडेआठच्या सुमारास काही तरुण पर्यटकांनी या पोळ्याला दगड मारल्याने ते मोहोळ उठले. यातील तीन ते चार जणांवर मधमाश्यांनी हल्ला केला. यावेळी परिसरात असणाऱ्या दोन दही विक्रेत्या महिलांनाही या माश्या चावल्या. याची माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे नियंत्रणाखालील पहारेकरी कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी यांनी मदत कार्य सुरू केले आहे.
पर्यटकांना कल्याण दरवाजा परिसरात जाऊ नये. यासाठी वनरक्षक बळिराम वायकर संदीप कोळी समितीचे सुरक्षारक्षक नितीन गोळे यांनी देव टाक्यापासून पर्यटकांना अडविले. तर नंदू जोरकर, स्वप्नील सांबरे, राहुल बोरकर व सुमीत रांजणे यांनी कल्याण दरवाजाच्या परिसरात वाळलेल्या गवताचा धूर केला.
उपाययोजना करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. तसेच काय काळजी घ्यावी, याचीदेखील माहिती देण्यात त्यांना आली होती.
- समाधान पाटील, वनपाल
सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांनी आपण शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आलो आहोत. वन विभागाच्या हद्दीत आले आहोत. याची जाणीव ठेवावी. आपल्या उपद्रवामुळे अन्य पर्यटकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.
-दीपक पवार, सहाय्यक उपवनसंरक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.