esakal | वेल्हे तालुक्यातील रानवडी येथील ४६ वृध्दांची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

senior citizen

वेल्हे तालुक्यातील रानवडी येथील ४६ वृध्दांची कोरोनावर मात

sakal_logo
By
मनोज कुंभार

वेल्हे : राज्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत, व्हेंटीलेटरचा तुटवडा, रेमडिसिव्हर औषधे मिळत नाही. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू या बातम्या आपण ऐकत- वाचत-पाहत आहोत तर, काही जणांना परिसरात अनुभवायला मिळत आहेत. काही कोरोनाबाधितांचा मृत्यू भितीमुळे, ह्द्यविकाराच्या झटक्याने होत आहेत. परंतू, यासर्व घटनांना अपवाद अशी घटना वेल्हे तालुक्यातील रानवडी येथील वृध्दाश्रमात घडली आहे. हो, हे खरे आहे. कुटुंबाचा आधार नसलेल्या ६० ते ९० वयोगटातील ४६ वृध्दांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यातील काही जणांनातर एका जागेवरुन दुसरीकडे हलविण्याची परिस्थिती नसताना ते रुग्ण बरे झाले आहे. यांच्याबाबत एकच सकारात्मक घटना होती ती म्हणजे या सर्वांचे लसीकरण एक महिन्यापूर्वी केले गेले होते. यातून लसीकरणाबाबत मोठा सकारात्मक संदेश समाजाला मिळत आहे.

रानवडी (ता.वेल्हे ) येथे 'जनसेवा फाउंडेशन' वृध्दाश्रमात पहिला रुग्ण ८ एप्रिल रोजी सापडला त्यानंतर येथील १६८ जणांची कोरानाची चाचणी केल्यानंतर याठिकाणच्या ४७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. एकाच वेळी एवढे पेशंट ते सुध्दा वयोवृध्द काहींना बेडवरुन हलता येत नव्हते, तर काहींना विविध व्याधी जडलेल्या या रुग्णांची परस्थिती होती. वेल्हे तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयात व कोंढावळे येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये शंभराहुन अधिक रुग्ण असल्याने बेड शिल्लक नव्हते तर पुण्यात बेड मिळणे अशक्य झाले आता या रुग्णांचे करायचे काय असा यक्ष प्रश्न निर्माण झाल्यानंतर याठिकाणास भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव , तहसिलदार शिवाजी शिंदे , गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर, वेल्हेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार,स्था निक जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी भेट देऊन परिस्थिती पाहणी केली.

img

in Velhe taluka 46 senior citizen form Ramwadi beat Corona

हेही वाचा: आता प्रवासासाठी पुन्हा ई-पास आवश्यक; कसा काढायचा?

याच ठिकाणी सर्व रुग्णांना उपचार देण्याचे ठरवून कोवीड केअर सेंटर उभे केले व उपचार सुरु झाले. उपचारास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टरांना जाणवले यामधून तेरा दिवसानंतर म्हणजे २१ एप्रिल रोजी ४६ रुग्ण बरे झाले तर दरम्यान एका वृध्दाचा मृत्यु झाला आहे. वेल्हे तालुक्यातील महसुल, पंचायत समिती व आरोग्य विभाग व स्थानिक लोकप्रतिनीधींच्या चिकाटीमुळे अशक्य ती गोष्ट शक्य झाल्याने तालुक्यातील सर्व स्थरांतून याचे कौतुक होत आहे.

''वृध्दाश्रमातील या रुग्णांवर उपचार करणे म्हणजे मोठे आव्हान होते परंतु रुग्णांकडुनसुध्दा उपचारास प्रतिसाद मिळणे म्हणजे या सर्वांनी महिन्यापुर्वी घेतलेल्या लसीचा परिणाम होय यामुळे तालुक्यासह सर्वत्र लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे.''

- डॉ.अंबादास देवकर तालुका वैद्यकीय अधिकारी वेल्हे.

''वेल्हे तालुका लोकसंख्येने छोटा असला तरी याठिकाणी कोणताही खाजगी सक्षम हॉस्पिटल नाही त्यामुळे सरकारी यंत्रणेमुळे याचा मोठा ताण येत आहे परंतु प्रशासनाच्या योग्य नियोजन व परिश्रमाच्या जोरावर असे सुखद अनुभव येत आहेत.''

- शिवाजी शिंदे ,तहसिलदार वेल्हे.

हेही वाचा: दहावीनंतर आता स्कॉलरशिप परीक्षाही रद्द होणार?