Army Recruitment Case : प्रकरण स्वतःकडे घेण्यास लष्कराची असमर्थता

दोन मेजरसह आठ जणांचा जामीन फेटाळला
Army Recruitment Case
Army Recruitment Case sakal
Updated on

पुणे : लष्कर भरती प्रक्रियेतील पेपर फुटी प्रकरणात लष्करातील कर्मचारी, दोन मेजर आणि एका लेफ्टनंट कर्नल दर्जाचा अधिकारी गुंतलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण कोर्ट मार्शलद्वारे चालविण्यात यावे यासाठी सरकार पक्षातर्फे कायदेशीर तरतुदींच्या आधारे न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. तो मंजूर होऊन तसे पत्र न्यायालयाने दक्षिण कमांड मुख्यालयास पाठविले होते. मात्र लष्कराने केस स्वतःकडे घेण्यासाठी असमर्थता दाखविली आहे, अशी माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी न्यायालयास दिली.

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आठ जणांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी फेटाळला. जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन मेजर आणि ॲकॅडमी चालकांचा समावेश आहे. मेजर किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. बारामती), माधव शेषराव गिते (ता. ३९, सॅपिअर विहान कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय ३१, रा. दिघी कॅम्प), उदय दत्तू औटी (वय २३, रा. खडकी), भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. जळगाव), मेजर थिरू मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. वेलिंग्टन, तमिळनाडू), वसंत विजय किलारी (वय ४५), विरा प्रसाद कोटीस्वामी नारगेपाटी (वय ४१, दोघेही रा. आंध्रप्रदेश) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लष्कर भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा पेपर परिक्षेच्या एक दिवस आधी मिळण्यासाठी ॲकॅडमी चालक आरोपींनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेतले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यास विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला.

आरोपींच्या मोबार्इलमधील डेटा मिळविण्यासाठी अमेरिकेत पत्रव्यवहार :

सर्व आरोपींनी संगनमत करून, कट रचून लेफ्टनंट कर्नल भगत प्रीतसिंग बेदी यांच्याद्वारे परिक्षेचा पेपर फोडून ते एकमेकांना व्हॉटसअपद्वारे व उमेदवारांना पाठविला आहे. फोडलेला पेपर आणि परिक्षेचा पेपर एकमेकांशी जुळविल्याबाबत लष्कराचा अभिप्राय अजून मिळालेला नाही. सर्व आरोपींच्या मोबार्इलमधील व्हाट्सॲपचा डेटा मिळविण्यासाठी व्हॉटसॲपच्या अमेरिकेतील मुख्यालयात पत्रव्यवहार केला आहे. त्याचा अहवाल प्रलंबित आहे, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.
The protesters also expressed support for the ongoing Jantar Mantar agitation and condemned the alleged police action against students in Delhi.
The CBI is investigating the cases, and the government says it is committed to protecting students' interests and ensuring transparency in competitive examinations.
The Pune Fire Brigade reported 372 tree fall incidents across the city between July 1 and July 23.
Marathi News Esakal
www.esakal.com