20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचा शुक्रवारी उद्घाटन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 December 2020

वारजे माळवाडी(पुणे) : साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजीत 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी होणार असून या दोन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून साहित्य रसिकांना परिसंवाद, कथाकथन,  कवी संमेलन अशा साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागाध्यक्ष दिलीप बराटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

वारजे माळवाडी(पुणे) : साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजीत 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी होणार असून या दोन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून साहित्य रसिकांना परिसंवाद, कथाकथन,  कवी संमेलन अशा साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागाध्यक्ष दिलीप बराटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, सचिव वि.दा. पिंगळे, संचालक देवेंद्र सुर्यवंशी, संचालक दिवाकर पोफळे आदी मान्यवर उपस्थित होते.  बराटे म्हणाले, ''यंदा संमेलनाचे 20 वे वर्ष आहे. कोविडमुळे संमेलनातील केवळ दोन कार्यक्रम कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. इतर सर्व कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात होणार आहे दोन दिवस नाट्यगृहातील कलादालनात चित्र प्रदर्शन आहे.''

शुक्रवारी 25 डिसेंबर - सकाळी 10:30 वाजता राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
- संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे आणि उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे महापाैर मुरलीधर मोहोळ आहेत.
- यादिवशी 'साहित्य-कला आणि जातीचे राजकारण' या विषयावर परिसंवाद ऑनलाइन होणार असून राजन खान आणि डाॅ. गणेश मोहिते सहभागी होणार आहेत. 
- दुपारी 4 वाजता प्रा. आप्पासाहेब खोत आणि डाॅ. प्रतिभा जाधव यांचे ऑनलाइन कथाकथन होईल.
- संध्याकाळी ६ वाजता 'संमेलनाध्यक्षांशी गप्पा' या कार्यक्रमात 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी डाॅ. वर्षा तोडमल संवाद साधतील.

शनिवारी 26 डिसेंबर- सकाळी ११ वाजता ऑनलाइन 'जम्मू काश्मिरमधील 'कलम 370' आणि '35 अ' हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का?' या विषयावरील परिसंवाद, होणार असून उल्हासदादा पवार आणि माधव भांडारी सहभागी होणार आहे. 
- दुपारी 2 वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाडी आणि त्यांचे सहकारी 'भारुडातून प्रबोधन' हा ऑनलाईन कार्यक्रम सादर करणार आहेत.
- दुपारी 4 वाजता.कोथरूडच्या यशंवतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड येथे 'वाग्यज्ञे साहित्य व कला गाैरव पुरस्कार' प्रदान सोहळा होणार आहे.
- ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका डाॅ. अरुणा ढेऱे आणि अभिनेते मोहन जोशी यांना हा पुरस्कार देणार आहे.
- रोख 11 हजार रुपये व सन्मान चिन्ह पुरस्काराचे स्वरुप आहे. स्व.रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ. 
- सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या ऑनलाईन कवी संमेलनाने होणार आहे. अध्यक्ष कवी अशोक नायगावकर सहभाग- रमण रणदिवे, एेश्र्वर्य पाटेकर, शिवाजी सातपुते, मनोहर आंधळे, देवा झिंजाड, प्रशांत केंदळे, मृणालिनी कानिटकर आणि अस्मिता जोगदंड 

ऑनलाईन प्रक्षेपण 
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे You Tube चॅनल, Facebook वर साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, वारजे-पुणे आणि Instagram वर dilipbaratepune72 यावर फॉलो करावे. रसिकांनी संमेलनातील सर्व कार्यक्रमांचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागत अध्यक्ष दिलीप बराटे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration Ceremony of the 20th Literary Artists Conference on Friday